गर्दी (नाम)
एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
बुटका (नाम)
खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
घुबड (नाम)
चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.
गोठा (नाम)
गुरे बांधण्याची जागा.
अरण्य (नाम)
जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.
खोगीर (नाम)
घोड्यावर नीट बसता यावे ह्यासाठी त्याच्या पाठीवर घालावयाचे विशिष्ट प्रकारचे लोकरी किंवा कातडी आसन.
कुवत (नाम)
एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म.
टोचून बोलणे (क्रियापद)
वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.
क्रीडा (नाम)
मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
आवाका (नाम)
सामावून घेण्याची क्षमता.